19 August, 2013

Buddha Preaching | सल्लेखसुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात : दुसरे लोक

सल्लेखसुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात :
  • दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी हानिकारक कृत्य करणार नाही, अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. 
  • जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसर्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करित असले, बड्बडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. 
  • जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोल मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या आर्य अष्टांगिक मार्गापासुन विचलित होणार नाही. दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासुन विचलित होता कामा नये. 
  • जरी दुसरे लोक आळशी असले तरी तुम्ही आळशी असता कामा नये. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निःशंक असले पाहिजे. 
  • जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव. इ. दोषांनी युक्त असले तरी तुम्हीमात्र त्या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाळगले पाहिजे. 
  • दुसरे लोक जरी लौकिक वस्तुंना चिकटुन असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले, तरी तुम्ही अशा वस्तुंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. मी असे म्हणतो की, चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञन (जाणीव) सुद्धा प्रभावित होते.
Buddha

No comments:

Post a Comment