Showing posts with label
महाकारूणिक भगवान बुद्धांनी दहा पारमिता पूर्ण करुन संबोधी प्राप्त केली..
Show all posts
Showing posts with label
महाकारूणिक भगवान बुद्धांनी दहा पारमिता पूर्ण करुन संबोधी प्राप्त केली..
Show all posts
 |
| Lord Buddha |
- महाकारूणिक भगवान बुद्धांनी समस्त प्राण्यांच्या हिताकरीता दहा पारमिता पूर्ण करुन उत्तम अशी संबोधी प्राप्त केली. या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो...
- शाक्य वंशाला आनंद देणार्या भगवान बुद्धांनी बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बसुन मारसेनेचा पराभव करुन विजय मिळविलब, त्याचप्रमाणे तुमचे कल्याण होवो.
- राग, द्वेष व मोहादी विकारावर देव-मनुष्याच्या कल्याणासाठी बुद्धरत्न या उत्तम औषधाचे सत्कार पुर्वक ग्रहण करावे, जेणेकरुन या तेजोमय बुद्धरत्नाच्या प्रभावाने तुमचे कल्याण होईल व सर्व उपद्रव आणि दुःक नाश पावतील...
- चिंता नष्ट करणारे श्रेष्ठ व उत्तम असे धम्मरत्न हे औषद आहे. त्याच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्वभय शांत होवोत..
- आमंत्रण व पाहुणचार करण्यास पात्र असलेले संघरत्न हे उत्तम आहे. अशा तेजोमय संघाच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्व उपद्रव व रोग नष्ट होवोत....
- ह्या अखिल विश्वात जी काही मौल्यवान रत्न गणली जातात, त्यात बुद्ध, धम्म व संग रत्नाची बरोबरी करणारे एकही अस्तित्वात नाही. ह्या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो..
- बुद्ध, धम्म व संघ या शिवाय अन्य कोणतेही शरण-स्थान (आधार) मला नाही, या सत्य वचनाने तुमचे कुशल मंगल होवो..
- तुमचे सर्व भय, वैर, रोग नष्ट होवोत. सर्व विघ्नबंधंन संपुन तुम्हाला सुख व दीर्घायुष्य प्राप्त होवो..