19 August, 2013

What is Mahamangal Suthraya ( Sutta ) ? | Types of Suttapitaka in Buddhism

Types of Suttapitaka in Buddhism

महामंगल सुत्त..
  • भगवान बुद्ध श्रावस्थी येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करत असताना,, एक व्यक्ती रात्र संपता, संपता आपल्या तेजाने सर्व जेतवन प्रकाशित करीत भगवंताजवळ आली व भगवंताला वंदन करुन एका बाजुला उभी राहिली. आणी एक गाथा म्हटली..
  • हे भगवान! स्वतःचे कल्याण इच्छिणार्या पुष्कळ देव आणी मणुष्यांनी मंगलाचा विचार करुनही ते त्यांना गवसले नाही. तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगा
  • भगवान म्हणाले- मुर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगती करणे व पुजनीय लोकांची पुजा करणे हेच उत्तम मंगल होय!!
  • अनुकुल स्थळी निवास करणे, पुर्वपुण्य पदरी असणे आणी स्वतःला सन्मार्ग लावणे हे उत्तम मंगल होय!!
  • अंगी बहश्रृतता असणे, कला संपादणे, श्ष्टता बाळगणे, आणी सुभाषण करणे,हेच उत्तम मंगल होय!!
  • आई वडिलांची सेवा करणे, पत्नी व मुलाबाळांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे,हेच उत्तम मंगल होय!!
  • दान देणे, धम्माचरण, आप्तेष्टांचा आदर-सत्कार करणे व पापाचरणांपासुन अलिप्त राहणेहेच उत्तम मंगल होय!!
  • काया, वाचा व मनाने अकुशल कर्म न करणे, मद्यपान न करणे व धार्मिक कार्यात तत्पर असणे. हेच उत्तम मंगल होय!!
  • गौरव करणे, अंगी नम्रता असणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणी वेळेवर धर्मश्रवण करणे, हेच उत्तम मंगल होय!!
  • क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे, सत्पुरुषांचे दर्शन घेणे व वेळोवेळी धार्मिक चर्चा करणे,हेच उत्तम मंगल होय!!
  • तप करणे, ब्रह्मचर्येचे पालन करणे, आर्यसत्याचे ज्ञान संपादणे आणी निर्वाणाचा साक्षात्कार करणे हेच उत्तम मंगल होय!!
  • ज्याचे मन लोक धर्माने विचलीत होत नाही, जो शोकही करीत नाही, तो तर अगदी निर्मळ व पवित्र राहतो, हेच त्याच्याकरीता उत्तम मंगल होय...
याप्रमाणे कार्य करुन जगात विजयी होऊन लोक कल्याणाचा साक्षात्कार करतात, हेच त्यांच्याकरीता उत्तम मंगल होय

Mahamangal Suthraya

No comments:

Post a Comment