Buddha and his Dhamma | अधम्म म्हणजे काय ?
१. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म !
२. माणसाला स्वतंत्रतापुर्वक शोध लावण्यासाठी सिद्ध करणे.
३. ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे.
१. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म !
- भगवान बुद्ध म्हणतात दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधर्म होय... त्यांच्यामते दैवी चमत्कृतीवरील विश्वास हा मनुष्याला अकार्यक्षम आणि आळशी बनवतो,, त्यामुळे मनुष्य कोणतेही कर्म न करता, सर्वस्वी देवावर अवलंबुन होतो. तो जर दैवी चमत्कृतींवर विश्वास ठेवु लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय?
- दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धांचे ती हेतु होते.
२. माणसाला स्वतंत्रतापुर्वक शोध लावण्यासाठी सिद्ध करणे.
३. ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे.
- यालाच बुद्ध धम्माचा कर्मसिद्धांत म्हणतत. हा बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म म्हणजेच बुद्धिवाद ! याच कारणास्तव दैवी चमत्कृतींवरील विश्वास अधम्म मानला जातो.
- भगवान बुद्धांनुसार ईश्वरावरील विश्वास म्हणजे अधर्म होय. त्यांच्यानुसार ह्या जगाची निर्मीती ईश्वराने केलेली नाही, ईश्वराने ह्या जगाची निर्मीती केली असे कोणीही सिद्ध करु शकत नाहे. हे जग रचलेले नसुन विकास पावलेले आहे.
- ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीच नाही. भगवान बुद्ध म्हणतात कि, ईश्वरावर आधारलेले धर्म हे कल्पनाश्रीत धर्म आहेत. म्हणुन ईश्वरावर आधारलेला धर्म काही उपयोगाचा नाही. त्यामुळे केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही हा विचार त्यांनी वासेठ्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणांबरोबर केलेल्या भाषणात स्पष्ट केला.
- ईश्वराने हे जग निर्मिले पण त्यान हे कशातुन निर्मिले? शुन्यातुन तर निर्माण करु शकत नाही. जर ईश्वराने हे जग पुर्वी अस्तित्वात असलेल्या संसाधन वापरुन निर्मिले असे म्हटले तर ह्या सृष्टीच्या पुर्वी काहीतरी अस्तित्वात असलेच पाहिजेत, त्यामुळे ईश्वराला त्याच्यापुर्वीच अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा निर्माता म्हणता येणार नाही.
- ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे, हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो...
- भगवान बुद्धांनी म्हटले आहे की, आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे.. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसुन मन आहे. मन हे आत्म्यापासुन भिन्न आहे.
- तथागत म्हणत आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणुन आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो. ज्याचे काही कारण नाही. असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. याच कारणामुळे आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असु शकत नाही.
- भगवान बुद्ध म्हणतात, यज्ञयागावर आधारलेला धर्म हा अधर्म आहे. यज्ञात सुरापान, पशूबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडते, तरी सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जातात. अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मान्यता दिली नाही.
- मी गतयुगात होतो कि नव्हतो? होतो तर काय होतो? भविष्यकाळातही मी असे काय? असे प्रश्न अनेकांना नेहमी पडतात... विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जातात त्यापैकी काही असे,,
- काहीजन म्हणतात कि, विश्व ब्रह्माने निर्माण केले, काहीजन म्हणतात कि ते अल्लाह ने निर्माण केले, काहीजन म्हणतात कि, ते यहोवा ने निर्माण केले आहे.
- असल्या प्रश्नांना भगवान बुद्धांजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारु शकतात. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धांचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानीत असे.
- विद्या अधिक नसली तरी चालते. कारण शील हीच सर्वोत्तम वस्तु आहे. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही, तोपर्यंत ते ज्ञान त्याला संकटातुन वाचवु शकत नाही.
- माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणुन त्यानुसार आपल्या विचारांचा जो संयम करु शकतो, तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजत पाठ करण्यात काय अर्थ?
- वैदिक लोकांसाठी वेद, ख्रिस्ती लोकांसाठी बायबल, मुस्लीमांसाठी कुराआन तर यहुदींसाठी बायबल, इत्यादी ग्रंत पवित्र तर आहेतच, एवढेच नव्हे तर, ते स्वतः प्रमाण आहेत..
- पण भगवान बुद्धांचा अशा गोष्टीस विरोध आहे. भगवान बुद्ध म्हणतात, जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सुक्ष्मत आहे, तेवढ्यावरुनच त्यावर विश्वास ठेवु नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणुन मानु नका. ते केव्ळ कोण्या थोरपुरुषांचे शब्द आहेत म्हणुन त्यावर भाळुन जाऊ नका.
- जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की, ह्या गोष्टी अहितकारक, परिणामी कष्टात किंवा दुक्खात नेणाऱ्या आहेत, म्हणुन ती मानु नका,, आधी ते तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासुन बघा. आणि जर पटत असेल तरच त्याचा स्विकार करा..
What is A-Dhamma |
No comments:
Post a Comment