19 August, 2013

What is Buddha, Dhamma and Sangha | Difference between Buddha Dhamma and Sangha

Difference between Buddha Dhamma and Sangha
बुद्ध :
  • ज्ञानाप्राप्तीनंतर तथागतांच्या मनात काही विचार निर्माण झाले होते. प्रथम तथागतांच्या मनात धम्म शिकवन्याविषयी शंका निर्माण झाली. आपण धम्म शिकवावे कि शिकवु नये? धम्म जगाला शिकवला नाही तर हा सारा जग दुःखाच्या सागरात बुडालेला, मानव समुह नेहमीसाठी दुःखातच राहिल, त्याची मुक्तता दुःखातुन होणार नाही. केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनुन स्वस्थ न बसता जगात जावुन त्यांची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, हे बुद्धाने ओळखले.
  • सिद्धार्थाने घोर तपश्चर्या करुन, बुद्धत्व प्राप्त केले. मार सेनेवर विजय मिळविला. राग, लोभ, द्वेश, मोह, कामवासना, तृष्णा ह्या विकारांवर विजय मिळविला व बुद्धत्व प्राप्त केले. बुद्धत्व कोणताही मनुष्य प्राप्त करु शकतो. आपले बाबासाहेबांनी बोधिसत्वत्त्व प्राप्त केले होते. जर त्यांना काही काळ जिवन लाभले असते तर कदाचित ते सुद्धा बुद्ध होउ शकले असते. विकारमुक्त जिवन जगणे व दुसर्यांना विकार मुक्त जिवन जगणयाचा मार्ग म्हणजेच बुद्ध.
धम्म :
  • म्हणजेच दुःख मुक्तीचा मार्ग. अरिय अष्टांगिज मार्ग. धम्म म्हणजे विज्ञान. बुद्धाने जे सांगीतले ते सर्व उपदेश आपण धम्माला सरण का गेले पाहिजे? नैसर्गीक सत्य, श्रद्धा व एकनिष्ठाता व्यक्त करण्यासाठी आपण धम्माला सरण गेले पाहिजे.
  • मत्सरामुळे भांडने होतात. रागामुळे सौंदर्य नष्ट होते. संयमामुळे कर्तव्याची जाणीव होते.स्नेहामुळे सशक्तपणा वाढतो.प्रामानिकपणामुळे धनसंपत्ती वाढते. अहंकारामुळे दुःख होते. शतृत्वामुळे दुबळेपणा येतो. चोरीच्या व्यवहाराने दारिद्र्य येते. मुर्खाच्या संगतीने मानुस ज्ञानापासुन दुर राहतो. ज्ञानी पुरुषांचे संगतीने मानसाच्या ज्ञानात भर पडते. विनय व नम्रता यामुळे सन्मान प्राप्त होते.
धम्म म्हणजे
1) जिवन शुद्धता राखणे
2) जिवनात पुर्णता आणणे
3) निब्बान प्राप्त करणे ( बोधिसत्त्व, अरहंत)
4) तृष्णेचा त्याग करणे.
5)सर्व संस्कार आशास्वत आहेत हे मानणे.
6) कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे.

संघ
  • संघ म्हणजे महासागर
  • बुद्धाच्या अनुयायांची 4 वर्गात विभागणी होते. 
1) भिक्खु 
2) श्रामणेर 
3) उपासक 
4) गृहस्थ


No comments:

Post a Comment