21 July, 2013

महाकारूणिक भगवान बुद्धांनी समस्त प्राण्यांच्या हिताकरीता दहा पारमिता पूर्ण करुन उत्तम अशी संबोधी प्राप्त केली.

Lord Buddha


  • महाकारूणिक भगवान बुद्धांनी समस्त प्राण्यांच्या हिताकरीता दहा पारमिता पूर्ण करुन उत्तम अशी संबोधी प्राप्त केली. या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो...
  • शाक्य वंशाला आनंद देणार्या भगवान बुद्धांनी बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बसुन मारसेनेचा पराभव करुन विजय मिळविलब, त्याचप्रमाणे तुमचे कल्याण होवो.
  • राग, द्वेष मोहादी विकारावर देव-मनुष्याच्या कल्याणासाठी बुद्धरत्न या उत्तम औषधाचे सत्कार पुर्वक ग्रहण करावे, जेणेकरुन या तेजोमय बुद्धरत्नाच्या प्रभावाने तुमचे कल्याण होईल सर्व उपद्रव आणि दुःक नाश पावतील...
  • चिंता नष्ट करणारे श्रेष्ठ उत्तम असे धम्मरत्न हे औषद आहे. त्याच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्वभय शांत होवोत..
  • आमंत्रण पाहुणचार करण्यास पात्र असलेले संघरत्न हे उत्तम आहे. अशा तेजोमय संघाच्या सत्कारपुर्वक सेवनाने तुमचे सर्व उपद्रव रोग नष्ट होवोत....
  • ह्या अखिल विश्वात जी काही मौल्यवान रत्न गणली जातात, त्यात बुद्ध, धम्म संग रत्नाची बरोबरी करणारे एकही अस्तित्वात नाही. ह्या सत्य वचनाने तुमचे कल्याण होवो..
  • बुद्ध, धम्म संघ या शिवाय अन्य कोणतेही शरण-स्थान (आधार) मला नाही, या सत्य वचनाने तुमचे कुशल मंगल होवो..
  • तुमचे सर्व भय, वैर, रोग नष्ट होवोत. सर्व विघ्नबंधंन संपुन तुम्हाला सुख दीर्घायुष्य प्राप्त होवो..

No comments:

Post a Comment